allfeeds.ai

 

Datta1702  

Datta1702

Author: Techno Launch

Language: mr

Genres: History

Contact email: Get it

Feed URL: Get it

iTunes ID: Get it


Get all podcast data

Listen Now...

स्वातंत्र्यवीर सावरकर याच्यावर होणारे आरोप आणि वास्तव आरोप क्रमांक - 1
Episode 1
Monday, 18 November, 2019

आरोप क्र. 1. - स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये गेल्यानंतर खचले आणि त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रं पाठविली. वस्तुस्थिती– स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली सुटका व्हावी, यासाठी अनेकदा आवेदनपत्रं पाठविली होती आणि ही वस्तुस्थिती त्यांनी आपल्या `माझी जन्मठेप' या आत्मचरित्रात कधीही लपविली नाही. परंतु या आवेदनपत्रांत कुठेही आपल्या कृत्याबद्दल माफी आणि पश्चाताप नाही. सावरकर बॅरिस्टर होते. त्यामुळे वकिलीबाण्याने आपल्या सुटकेसाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न करणे त्यांच्या दृष्टीने गैर नव्हते कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणे आणि पुन्हा लढा उभारणे, हे प्रत्येक क्रांतिकारकाचे कर्तव्य आहे, हे सावरकरांचे मत होते. हे अंदमानात असलेल्या क्रांतिकारकांपुढे वारंवार मांडत. याला पुरावा म्हणजे थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ संन्याल. लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची सजा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन सुटले. नंतर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतिकार्य सुरू केले आणि प्रसिद्ध काकोरी कटाचे सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेपही झाली होती. आपल्या बंदी जीवन या आत्मचरित्राच्या पान 226 वर ते म्हणतात, ``सावरकरांनी केलेल्या अर्जात माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते, परंतु माझी सुटका झाली पण त्यांची का नाही?... ... ... कारण सरकारला अशी भीती होती की, सावरकरांची सुटका झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल.''  विरोधक नेहमी नोव्हेंबर 1913 सालचा सावरकरांनी केलेले अर्ज देतात . परंतु त्या अर्जात कुठेही पश्चाताप किंवा माफी नाही. हा अर्ज त्यांनी सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांना देताना त्यांच्याशी व्यक्तीगत चर्चा केली होती. हा अर्ज सरकारकडे पाठविताना रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की, ``It cannot be said to express any regret or repentance.'' परंतु हे वाक्य विरोधक सोयीस्कररित्या गाळतात. त्यांचे हे कृत्य, संशोधन नसून फसवेगिरी आहे. हे सिद्ध होते. स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात खचले होते की नाही आणि सावरकरांनी सुटकेच्या अर्जात लिहलेला मजकूर हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग होता की नाही, हे बघायचे असेल तर त्यासाठी जेलमध्ये त्यांच्याबरोबर शिक्षा भोगत असलेले क्रांतिकारक आणि तुरुंगाच्या नोंदी तपासणे, हाच एकमेव मार्ग आहे, सावरकरांबरोबर तुरुंगात असलेले क्रांतिकारक उल्लासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा या प्रसिद्ध क्रांतिकारकांनीआपल्या आत्मचरित्रात केलेले सावरकरांचे उल्लेख वस्तुस्थिती स्पष्ट करते. उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झटका आला होता. त्या आधी त्यांना जेव्हा हातकडीत टांगून ठेवले होते. तेव्हा तापाच्या भरात त्यांना भास झाला. त्यात जेलर बारी ने त्यांना द्ंवद्व युद्धाचे आव्हान दिल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने लढतात व बारीचा पराभव करतात. (12 years in prison life – page 64 & 65) आता अगदी भ्रमात असतानादेखील सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आहेत, हा उल्लासकर दत्त यांचा विश्वास हा सावरकरांचे मनोबल 1912 साली कसे होते, हे सिद्ध करतो. 1913 साली सुराज्य पत्राचे संपादक रामशरण शर्मा यांना संपात भाग घेतल्याबद्दल जेव्हा सजा वाढविण्याची धमकी जेलरने दिली तेव्हा त्यांनी उत्तर दिले ``यदि विनायक सावरकर की 50 वर्ष कट सकती हैं, तो मैं भी काट लूंगा।'' (काला पानी का ऐतिहासिक दस्तऐवज पृष्ठ 53) म्हणजेच 1913 साली देखील क्रांतिकारकांचे सावरकरांचे एक आदर्श म्हणूनच बघत होते. जर सावरकरांचे मनोबल तुटले असते तर असे शक्य होते का? 1919 सालच्या संपाबद्दल अंदमानमध्ये सजा भोगत असलेले महान क्रांतिकारक भाई परमानंद आपल्या आपबीती या चरित्रात म्हणतात की, जेलमध्ये झालेल्या कुठल्याही संघर्षासाठी जेलर बारी आणि पर्यवेक्षक सावरकर बंधूंनाच जबाबदार धरत असत.  (आपबीती– पृष्ठ 102) सावरकरांनी जेलमध्ये कुठलेही कष्ट भोगले नाही, असा एक बिनबुडाचा आरोप विरोधक करतात. परंतु अंदमानमध्ये 1916 ते 1921 मध्ये सजा भोगत असलेले महान क्रांतिकारक पृथ्वीसिंह आझाद यांचा अनुभव काही वेगळेच सांगतो. ``वीर सावरकर ने आधुनिक भारत के युवकों को क्रांती का पाठ पढाया था। क्रांतिकारी वृत्तीवाले नवयुवकों के वे तेजस्वी नेता थे। ऐसे सामर्थ्यशाली व्यक्ति के अंग्रेज अधिकारियों ने वह काम लिया जो बैलोंसे लिया जाता था। तेल के कोल्हू पर प्रतिदिन तीस पौंड तेल निकालने के लिए सावरकर को मजबूर किया गया।''  (क्रांति के पथिक - पृष्ठ 108) पृथ्वीसिंह आझाद पुढे भारतात परत आल्यानंतर ब्रिटिशांच्या कैदेतून निसटल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांनीच त्यांना आसरा दिला होता. (क्रांति के पथिक– पृष्ठ 153)

 

We also recommend:


The Endless Knot
Mark Sundaram & Aven McMaster

Angry Planet
Matthew Gault and Jason Fields

Afternoonified
So Below Media

War Stories
War Stories

Com Tempo e Alma

Podcasteriet
Podcasteriet

The American Story
Christopher Flannery

A Sense Of The Macabre
sensemacabrepod

The Smiley Signal
Hosted by Stephanie Nicole Hanna and Danielle Mae Franklin

Alejandra Guerra

Itsmine
Evi Tamimi

Pras PODCAST
Hendrawan Adi