![]() |
KrutiKavyaAuthor: Krutika Shantaram Deore Language: mr Genres: Music, Music Commentary Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it |
Listen Now...
Kana Marathi Kavita।कणा मराठी कविता।। कुसुमाग्रज।kusumagraj।Krutika Deore।Poems
Thursday, 30 April, 2020
फक्त लढ म्हणा(कणा) हि वि.वा. शिरवाडकर यांची एक अतिशय लोकप्रिय आणि प्रेरणादायी कविता आहे. कणा ‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून : ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!